मुरुड: मुरुड डम्पिंग ग्राऊण्ड, घनकचरा प्रकल्प सुधारण्याची गरज
Murud, Raigad | May 4, 2026 पर्यटन स्थळ असलेल्या मुरुडलाही कचरा व्यवस्थापनाची मोठी समस्या जाणवत आहे. सद्यस्थितीत असलेल्या डम्पिंग ग्राऊंडसह घनकचरा व्यवस्थापन सुधारण्याची आवश्यकता निर्माण झालेली आहे. यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकारघेऊन डम्पिंग ग्राऊंडसाठी जागा उपलब्ध करुन देण्याची गरज आहे. मुरुड जंजिरा न.प. हद्दीचे क्षेत्र हे 3.63 चौ.कि.मी.चे आहे. शहराची लोकसंख्या 2011 च्या जनगणनेनुसार 12, 226 ऐवढी आहे. न.प. हद्दीमध्ये कचरा संकलीत करण्यात येणाऱ्या घरांची संख्या 2809 आहे.