बदनापूर: बस स्थानकासमोर ट्रक व बसचा भीषण अपघात सुदैवाने जीवितहानी नाही मात्र ,दोन्ही वाहनांचे नुकसान
आज दिनांक 3 मे 2026 वार रविवार रोजी दुपारी 5वाजता मिळालेल्या माहितीनुसार बदनापूर शहरातील बदनापूर ते छत्रपती संभाजी नगर या मुख्य मार्गावर असलेल्या बस स्थानकासमोर दिनांक 2 मे 2026 रोजी ट्रक व बसचा भीषण अपघात झाला आहे हा अपघात समोरील चाललेल्या बसला मालवाहू ट्रकने भीषण धडक दिल्याने झाला असून यामध्ये दोन्ही वाहनांचे नुकसान झाले आहे मात्र सुदैवाने कुठलीही जीवित हानी झालेली नाही.