पालघर: अनाधिकृतरित्या वास्तव करणाऱ्या दोन बांग्लादेशी नागरिकांना निळेमोरे परिसरातून नालासोपारा पोलिसांनी केली अटक
नालासोपारा पोलीस ठाणे हद्दीत अनधिकृतरित्या बांगलादेशी नागरिक वास्तव्य करत असल्याची माहिती नालासोपारा गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे निळेमोरे परिसरात पोलिसांनी छापा टाकला असता सोफीकुल शेख आणि मुनीर शेख या दोन बांगलादेशी नागरिकांना ताब्यात घेत त्यांची चौकशी केली असता भारतात राहण्यासाठी आवश्यक असलेली कोणतीही कागदपत्रे आढळून आली नाही. पोलिसांनी दोनही आरोपींना अटक केली असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.