पालघर: भरधाव दुचाकीच्या धडकेत राजोडी समुद्रकिनाऱ्यानजीक रस्त्यावर वृद्धाचा मृत्यू
अर्नाळा सागरी पोलीस ठाणे हद्दीत भीषण असा अपघात घडला आहे. राजोडी येथील आशिष रॉड्रिग्स प्रार्थनेसाठी चर्चमध्ये गेले होते. प्रार्थना झाल्यानंतर ते त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीसोबत रस्त्याच्या कडेला उभे राहून बोलत होते. याचवेळी अर्नाळाहून राजोडीच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव दुचाकीने आशिष रॉड्रिग्स यांना धडक दिली.या अपघातात आशिष रॉड्रिग्स यांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीचालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहे.