पालघर: खैरपाडा परिसरातून दीड लाख रुपये किमतीच्या दुचाकीची चोरी; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल
पोलिओ पोलीस ठाणे हद्दीतील खैरपाडा परिसरातून दुचाकीची चोरी झाल्याची घटना घडली आहे. खैरपाडा वसई रेंज ऑफिस परिसरात नूरजान खान याने त्याची दुचाकी पार्क करून ठेवली होती. अज्ञात चोरट्याने दीड लाख रुपये किमतीची दुचाकी चोरून चोरटा पसार झाला आहे. याप्रकरणी वालीव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात वाहन चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.