पालघर: नालासोपारा अग्रवाल परिसरात आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्याबाबत नागरिकांना देण्यात आले प्रशिक्षण
आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास या परिस्थितीला नागरिकांनी कशाप्रकारे सामोरे जावे यासाठी नालासोपारा अग्रवाल परिसरात नागरिकांना प्रात्यक्षिक दाखवून प्रशिक्षण देण्यात आले. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी काय करावे, काय करू नये कशाप्रकारे स्वतःचा व इतरांचा बचाव करावा याबाबत प्रात्यक्षिक दाखवून प्रशिक्षण देत मार्गदर्शन करण्यात आले. नागरी सुरक्षा दल अग्निशमन दल व प्रशासन यांच्या वतीने नागरिकांना यावेळी प्रशिक्षण देण्यात आले.