पालघर: मनोर- वाडा मार्गावर करळगाव नजीक रिक्षाचा अपघात; चालक जखमी
पालघर जिल्ह्यातील मनोर- वाडा मार्गावर रिक्षाचा भीषण असा अपघात घडला आहे. रिक्षाचालक सुभाष गोवारी त्यांची रिक्षा घेऊन जात असताना रिक्षावरील त्यांचे नियंत्रण सुटले आणि करळगाव नजीक रस्त्यावरून रिक्षा 15 ते 20 फूट खाली कोसळली. या अपघातात रिक्षाचालक सुभाष गोवारी जखमी झाल्या असून त्यांना रुग्णवाहिकाच्या मदतीने मनोहर येथील रुग्णालय उपचारासाठी दाखल करण्यात आले. सुदैवाने अपघात घडला त्यावेळी रिक्षात इतर प्रवासी नसल्याने मोठी दुर्घटना टळली.