पालघर: सफाळे येथील तोतया आयएएस अधिकाऱ्याविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
डेप्युटी कलेक्टर म्हणजेच आयएएस अधिकारी असल्याचा बनाव करा खोटे दस्तावेज बनवून कोट्यावधींचा जमीन घोटाळा केल्याचा प्रकार सफाळे परिसरात समोर आले आहे. सफाळे येथील या तोतया आयएएस अधिकाऱ्या विरोधात मंडळ अधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतीक मोहन पाटील असे या आरोपीचे नाव असून याप्रकरणी अधिक तपास सफाळे पोलीस करीत आहेत.