काटोल: काटोल तालुक्याला वादळी पावसाचा तडाखा; येनवा गावात घरांची पडझड, संत्रा-मोसंबीच्या बागा उद्ध्वस्त
[
Katol, Nagpur | Jun 1, 2026 काटोल तालुक्यात आज अचानक आलेल्या भीषण वादळाने आणि मूसलाधार पावसाने मोठी तबाही माजवली आहे. निसर्गाच्या या प्रकोपाचा सर्वाधिक फटका तालुक्यातील **येनवा** गावाला बसला असून, येथे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे.येनवा गावात सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावली. वादळ इतके भीषण होते की, गावातील अनेक कच्ची व मातीची घरे कोसळली आहेत. घरमालकांचे संसार उघड्यावर आले असून, सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाहीं