कामठी: आगीच्या धुराने स्थानीय नागरिक हैराण,आजनी परिसरात दोन महिलांचा संशयास्पद मृत्यू
Kamptee, Nagpur | Apr 20, 2026 कामठी गुमथळा मार्गावरील आजni क्षेत्रात दोन दिवसांपासून सुरू असलेल्या आगीमुळे मोठ्या प्रमाणात विषारी धूर पसरला होता. याचा फटका आजनी गावाला बसला आहे. या आगीपासून निघणाऱ्या धुरामुळे या परिसरात श्वास घेणे कठीण झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.19 एप्रिल ला रात्रीच्या सुमारास दोन महिलांचा संशयास्पद मृत्यू झाला. मृतकांमध्ये सुलोचना हेटे आणि चंद्रभागा वाणी यांचा समावेश आहे.ग्राम पंचायत सदस्या हेमलता उकेबोंदरे यांना सुद्धा श्वास घ्यायला त्रास होतो आहे