काटोल: पेपरफुटीच्या घटनांमुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीवर; दोषींवर कठोर कारवाईची मागणी तीव्र!: माजी गृहमंत्री देशमुख
Katol, Nagpur | Jun 27, 2026 राज्यात गेल्या काही काळापासून स्पर्धा परीक्षा आणि विविध प्रवेश परीक्षांच्या पेपरफुटीच्या घटनांनी थैमान घातले आहे. वारंवार होणाऱ्या या प्रकारामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरत असून, त्यांच्या भवितव्याबद्दल मोठी चिंता निर्माण झाली आहे.