अंबरनाथ: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बदलापूर येथे जाऊन आंदोलनकर्त्यांच्या कुटुंबीयांशी भेट घेऊन केली चर्चा
मागील काय दिवसापूर्वी बदलापूर येथील एका शाळेमध्ये कर्मचाऱ्याने दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली होती. त्यानंतर बदलापूर बंदची हाक देण्यात आली.रेल्वे रुळावर बसून आंदोलन केले.पोलिसांकडून लाठीचार्ज आणि आंदोलनकर्त्यांकडून दगडफेक करण्यात आली. यामध्ये शेकडो आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल केले. त्यानंतर आज 28 ऑगस्ट रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बदलापूर येथे जाऊन आंदोलनकर्त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली आहे. पीडित कुटुंबांची भेट घेणार असल्याची माहिती मिळत आहे.