अंबरनाथ: बदलापूर नागरिकांनी केली रेल रोको पोलिसांकडून लाठीचार्ज तर नागरिकांकडून दगडफेक, आंदोलनाला हिंसक वळण
बदलापूर येथे दोन चार वर्षांच्या चिमूरड्यांवर लैंगिक अत्याचार केल्याच्या निषेधार्थ बदलापूर मधील नागरिकांनी रेल्वे ट्रॅकवर उतरून रेल्वे सेवा बंद करण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी समजूत काढूनही ऐकत नसल्यानंतर लाठीचार्ज करण्यास सुरुवात केली. त्यानंतर संतप्त झालेल्या आंदोलन कर्त्या बदलापूरकरांनी लाठीचार्जला दगडफेक करून प्रत्युत्तर दिले. एकूणच या आंदोलनाला हिंसक वळण लागले असून नागरिक संतप्त झाले आहेत आणि रेल्वे ट्रॅक वर बसून ठिय्या आंदोलन करत आहेत