अंबरनाथ: बदलापूर येथील लैंगिक अत्याचार नंतर पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी भेट घेऊन कारवाईचे दिले आदेश
बदलापूर येथे झालेल्या लैंगिक अत्याचार नंतर शहरात संतापाची लाट उसळली होती. बदलापूर परिसरामध्ये मोठे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर घटनास्थळी भेट देऊन प्रकरणाची चौकशी केली. 21 ऑगस्ट रोजी पुन्हा पालकमंत्री शंभूराजे यांनी भेट देऊन सर्व परिस्थितीचा आढावा घेतला. या प्रकरणांमध्ये जे जे कोणी दोषी असेल त्या सर्वांवर योग्य ती कारवाई केली जाईल अशी माहिती पत्रकार परिषदेत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.