अंबरनाथ: माझे शिक्षण मंत्री पद गेले तरी चालेल पण सर्वांवर कारवाई होणार: बदलापूर लैंगिक अत्याचारावर मंत्री दीपक केसरकर प्रतिक्रिया
बदलापूर येथे दोन चार वर्षाच्या चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार केल्याच्या निषेधार्थ बदलापूर मध्ये संतापाची लाट उसळली होती. 20 ऑगस्ट रोजी केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. पोलिसांकडून लाठी चार्ज तर नागरिकांकडून दगडफेक करण्यात आली होती. त्यानंतर रात्री उशिरा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी घटनास्थळी भेट देऊन शाळा प्रशासन,अधिकारी,पोलीसांवर कारवाई करणार असून त्याचा तपास सुरू आहे अशी माहिती दिली. माझे शिक्षण मंत्री पद गेले तरी चालेल पण सर्वांवर कारवाई होणार असेही केसरकर म्हणाले.