अंबरनाथ: शाळेत चार वर्षाच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याच्या निषेधार्थ बदलापूर बंदची हाक, शाळेसमोर ठिय्या आंदोलन
बदलापूर येथील एका शाळेमध्ये दोन चार वर्षाच्या चिमुकल्यांवर अत्याचार झाल्याची घडली होती. त्या चिमुरड्यांनी शाळेत जाण्यास नकार दिल्यानंतर पालकांना शंका आली आणि वैद्यकीय तपासणी केली असता अत्याचार झाल्याचे समोर आले. तातडीने पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली मात्र पोलिसांनी गुन्हा नोंद करण्यास टाळाटाळ केली तब्बल बारा तासानंतर गुन्हा नोंद केला. तसेच शाळेतील सीसीटीव्ही फुटेज देण्यासाठी शाळा देखील तयार नाही त्यामुळे प्रकरणाच्या निषेधार्थ बदलापूरकरांनी एकत्र येऊन शाळेसमोर आंदोलन केले जात आहे.