अंबरनाथ: बदलापूर अंबरनाथ येथे हिट अँड रन प्रकरण आले समोर, कार ने अनेकांना चिरडले, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
बदलापूर अंबरनाथ रोडवर धक्कादायक घटना घडली आहे. एका कारचालकाने समोर उभे असलेल्या कार मधील एकाला शंभर ते दोनशे फूट पुढे फरफटत नेले आणि परत येऊन कारला जोराची धडक दिली. जोराचा धक्का बसल्याने ती कार पाठीमागे ढकलली गेली आणि पाठीमागे असलेल्या दोन दुचाकी आणि त्यावरील व्यक्ती देखील चिरडले गेले. तसेच कार मध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश होता ते देखील जखमी झाले असून यामध्ये पाच ते सहा जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.