उमरेड: "क्या रे जानी" म्हणणे पडले महागात! उमरेडमध्ये किरकोळ कारणावरून प्रौढाचा खून; आरोपी २४ तासांत गजाआड.
Umred, Nagpur | May 25, 2026 उमरेड पोलीस स्टेशन अंतर्गत कावरापेठ भागात किरकोळ वादातून एका ५० वर्षीय व्यक्तीची चाकू भोसकून हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पोलिसांनी अवघ्या २४ तासांच्या आत मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.२४ मे रोजी रात्री १० ते ११ च्या सुमारास, कावरापेठ येथील एका पानठेल्यासमोर फिर्यादी, राजकुमार पवार आणि शाहिद नसीम शेख हे मेकॅनिकल कामाबद्दल बोलत उभे होते. दरम्यान, तिथे आलेल्या सोहेल उर्फ जानी शाहिद शेख याला मृतक राजकुमार पवार यांनी "क्या रे जानी" म्हणत त्याच्या मानेवर हात मारला.