बनशेळकी येथील ग्रामदैवत महादेव मंदिरात आमदार संजय बनसोडे यांच्या हस्ते महाआरती; टाळ वाजवत झाले मंत्रमुग्ध
उदगीर, दि. 28 (प्रतिनिधी) -पवित्र श्रावण मासाचे औचित्य साधून उदगीर तालुक्यातील बनशेळकी येथील ग्रामदैवत श्री महादेव मंदिरात माजी मंत्री तथा आमदार संजय बनसोडे यांच्या हस्ते महाआरती व पूजन अत्यंत भक्तिमय वातावरणात संपन्न झाले.
श्रावण महिन्यानिमित्त येथील महादेव मंदिरात दररोज नित्य पूजा, अभिषेक व आरती होत असते. त्याचाच एक भाग म्हणून आज आमदार संजय बनसोडे यांनी मंदिरात येऊन महादेवाचे दर्शन घेतले व त्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.
फुलांनी सजले मंदिर -यानिमित्त मंदिराला झेंडू, शेवंती व गुलाबाच्या फुलांनी आकर्षक सजावट करण्यात आली होती. फुलांच्या माळा व आरास यामुळे मंदिराचा गाभारा खुलून दिसत होता.
आरती सुरू असताना आमदार बनसोडे यांनी स्वतः हातात टाळ घेऊन ठेका धरत भजनात तल्लीन होत महादेवाच्या भक्तीत मंत्रमुग्ध झाल्याचे पाहायला मिळाले. त्यांच्या या भक्तिभावाचे उपस्थितांनी कौतुक केले.
यावेळी जिल्हा परिषदेचे सभापती ज्ञानेश्वर बिरादार, जिल्हा परिषद सदस्य तथा गटनेते दिलीपकुमार मटके, वसंत पाटील, लक्ष्मीताई श्रीमंडळे, कमलाकर फुले, बब्बर सय्यद, सारंग लोहारे, महादेव पाटील, उमा लोहारे, संकेत बिरादार, मन्मथ स्वामी यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक व मोठ्या संख्येने भाविक भक्त उपस्थित होते.
हर हर महादेवच्या जयघोषाने संपूर्ण मंदिर परिसर दणाणून गेला होता.
Latur, Latur | Aug 29, 2026