कामठी: जुनाट वादातून शिवीगाळ व मारहाणीचा प्रयत्न; नवीन कामठी पोलिसांत एनसीआर दाखल
Kamptee, Nagpur | Jan 18, 2026 जुनाट वादातून एका व्यक्तीला शिवीगाळ करून त्याला मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याची घटना नवीन कामठी पोलीस स्टेशन अंतर्गत रामगड भागात घडली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी रंजीत राधेश्याम डोंगरे हे रामगड अनाज गोडाऊन जवळील आपल्या झोपडीसमोर जेवण करत होते. यावेळी आरोपी सुहाष गणेश मांजी हा दारूच्या नशेत तिथे आला. त्याने जुन्या वादावरून फिर्यादीला अश्लील शिवीगाळ केली आणि मारहाण केली.