कामठी: लग्नाचे आमिष दाखवून २७ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार, नवीन कामठी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
कामठीमध्ये २७ वर्षीय तरुणीवर लग्नाचे आमिष दाखवून वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आरोपीने तरुणीला जातीवाचक शिवीगाळ करत मारहाणही केली आणि अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. याप्रकरणी नवीन कामठी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत