अंबरनाथ: बदलापूर रेल्वे स्टेशन परिसरात ट्रांसफार्मरमध्ये स्फ़ोट झाल्याने 60 ते 70 दुचाकी गाड्या जळून खाक
बदलापूर रेल्वे स्टेशन परिसरातील वैशाली सिनेमागृह जवळ ट्रान्सफॉर्मर मध्ये स्फोट झाल्याची घटना घडली होती. ट्रांसफार्मर मध्ये स्फोट झाला आणि जवळच असलेल्या पार्किंग मधील दुचाकी गाड्यांनी पेट घेतला. आगीने रुद्ररूप धारण केले आणि यामध्ये जवळपास 60 ते 70 दुचाकी गाड्या जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. आजूबाजूला नागरी वस्ती होती त्यामुळे त्याची झळ नागरी वस्तीत पोहोचू नये, यासाठी तातडीने अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि शर्तीने प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले.