अंबरनाथ: अंबरनाथ पंचायत समिती येथे मुख्य कार्यकारी अधिकारी शिसोदे यांनी घेतली विभागनिहाय आढावा बैठक
तालुकास्तरावरील राबविण्यात येणाऱ्या योजनांची सविस्तर माहिती घेऊन योग्य मार्गदर्शन करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांनी अंबरनाथ पंचायत समितीला भेट देऊन विविध कामकाजाचा आढावा घेतला. लोकसभा सर्वत्रिक निवडणुकांमधील कामकाज आणि प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेअंतर्गत 402 घरकुलांची 100% बांधणी झाल्याबद्दल सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. तसेच तालुक्यात बोगस बियाणे ,शेतकऱ्यांना बांबू लागवडी संदर्भात बैठक घेऊन योग्य माहिती देण्याची निर्देश शिसोदे यांनी दिले.