बदनापूर: उज्जैनपुरी येथे सत्तर फूट विहिरीत पडलेल्या 2 बैलांना गावकऱ्यांच्या एक्कीने मिळाले जीवनदान
आज दिनांक 7 जून 2026 वार रविवार रोजी दुपारी 12 वाजेच्या सुमारास बदनापूर तालुक्यातील उज्जैनपुरी येथे शेतकरी ज्ञानेश्वर झुंबड हे शेतात बैलांच्या माध्यमातून शेती मशागतीचे काम करत असताना अचानक त्यांच्या बैलांचा तोल गेला व ते 70 फूट विहिरीत जाऊन पडले यावेळी त्यांनी आरडाओरड केले असता गावकरी त्यांच्या मदतीला धावले व एक्कीचे बळ दाखवत या दोन्हीही बैलांना आज जीवनदान झाले आहे, घटनेची माहिती मिळताच आमदार नारायण कुचे यांनी सुद्धा घटनास्थळी गाव घेत गावकऱ्यांना मदत केली आहे.