तिरोडा: निमगाव ईंदोरा येथे दहीकाला कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष जगदीश(बालू) बावनथडे यांची उपस्थिती
Tirora, Gondia | Nov 5, 2025 कार्तिक पौर्णिमेच्या मंगलमय पर्वावर इंदोरा (निमगाव) येेथे श्री सुखचंदजी टेंभरे महाराज यांच्या घराजवळील माता मंदिर येथे भक्तीमय वातावरणात 'दहिकाला' अर्थात दहीहंडीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला. या उत्सवाला विशेष उपस्थिती लाभली ती जनतेचे लाडके लोकप्रतिनिधी, कार्यक्षम जिल्हा परिषद सदस्य आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तिरोडा तालुका अध्यक्ष श्री. जगदीश(बालू) बावनथडे यांची.