नागपूर शहर: प्रशासकीय यंत्रणेच्या गलथान कारभारामुळे सलमानचा वीजेच्या धक्क्याने मृत्यू, मृतदेह घेऊन थेट पोहोचले एमएसईबी कार्यालयात
शहरातील प्रभाग क्रमांक ४ मधील एका अत्यंत दुर्देवी घटनेत वीजेचा तीव्र झटका लागल्यामुळे सलमान नावाच्या तरुण युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे. ही केवळ दुर्घटना नसून प्रशासकीय आणि एमएसईबीच्या निष्काळजीपणामुळे झालेला 'प्रशासकीय खून' असल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते फहीम खान यांनी केला आहे. दरम्यान आज महावितरण च्या कार्यालयासमोर मृतदेह ठेवून धरणे आंदोलन करण्यात आले