रामटेक: नगरधन येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर संपन्न
Ramtek, Nagpur | Mar 7, 2026 रामटेक तहसील कार्यालय अंतर्गत नगरधन मंडळ स्तरावरील छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अभियान टप्पा क्रमांक एक अंतर्गत नगरधन मंडळ द्वारे शनिवार दिनांक 7 मार्चला सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजता पर्यंत मोहित सभागृह नगरधन येथे शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर तहसीलदार रमेश कोळपे यांच्या मार्गदर्शनात संपन्न झाले. या शिबिरात नगरधन मंडळातील नगरधन, आजनी, लोह डोंगरी,काचूरवाई, बोरी, किरणापुर, नवरगाव, चिचाळा मंडळांतर्गत सर्व विभागांकडून एकूण 805 लाभार्थ्यांनी लाभ घेतला.