काटोल: क्रिकेट सट्टा खेळणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; ७८ हजारांचा मुद्देमाल जप्त
Katol, Nagpur | Apr 21, 2026 नागपूर ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने काटोल येथील अर्जुन नगर भागात छापा टाकून क्रिकेटवर सट्टा लावणाऱ्या दोन जणांना अटक केली आहे.आरोपीमध्ये सजल सुरेश सोमकुवर आणि विनय उर्फ बिनू राजेश्वर वर्मा यांचा समावेश आहे.आरोपी मोबाईल ॲपद्वारे 'टाटा इंडियन प्रीमियर लीग'च्या सामन्यांवर सट्टा लावत होते.दोन मोबाईल आणि १८ हजार रोख रक्कम असा एकूण ७८,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, काटोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.