नागपूर शहर: नागपूर प्रादेशिक मनोरुग्णालयातील धक्कादायक प्रकार: बरा झालेल्या तरुणाने घरी कुलूप आणि नातेवाईकांचा पाठिंबा नसल्याने संपव
नागपूरच्या प्रादेशिक मनोरुग्णालयातून मानसोपचारांनंतर पूर्णपणे बरा झालेला २४ वर्षीय तरुण महेंद्र सुरेश निखारे राहणार तुमसर याला न्यायालयाच्या परवानगीने घरी सोडण्यात आले होते. रुग्णालयाचे कर्मचारी त्याला घेऊन त्याच्या घरी पोहोचले, मात्र घराला कुलूप होते आणि नातेवाईकांकडूनही कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.कुटुंबीय उपलब्ध नसल्याने आणि स्वीकारत नसल्याच्या भावनेने नैराश्यात गेलेल्या महेंद्रला पुन्हा रुग्णालयात आणल्याने स्वच्छतागृहात गळफास घेऊन आत्महत्या केली.