उमरेड: उमरेड सह नागपूर ग्रामीण पोलिसांना उन्हापासून दिलासा; 'एअर कूल्ड जॅकेट'चे वाटप
Umred, Nagpur | Apr 30, 2026 वाढत्या उन्हाचा कडाका लक्षात घेता, नागपूर ग्रामीण जिल्हा पोलीस दलातील वाहतूक अंमलदारांच्या आरोग्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक हर्ष ए. पोद्दार आणि अपर पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली आज, ३० एप्रिल रोजी सर्व वाहतूक अंमलदारांना एअर कूल्ड जॅकेट' वितरित करण्यात आले.दिवसभर रस्त्यावर कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांना उष्माघाताचा त्रास होऊ नये आणि शरीराचे तापमान नियंत्रित राहावे.