महाड: रायगड पालकमंत्रीपदाचा निर्णय लवकरच
Mahad, Raigad | Jun 30, 2026 छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५३ व्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी मी इथे आलो होतो. अतिशय सुंदर सोहळा पार पडला. छत्रपतींच्या आशीर्वादाने सगळ्या गोष्टी सुरळीत होतील लवकरच पालकमंत्री पदाचा निर्णय देखील होईल आणि तुम्हाला त्याची बातमी मिळेल असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी किल्ले रायगडावर पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले. रायगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५३ वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करण्यासाठी शिंदे आज रायगडावर आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.