महाराष्ट्रात फिटनेस इन्फ्लुएंसर्सना FDA चा इशारा! हेल्थ सप्लिमेंट्सच्या भ्रामक जाहिराती केल्यास 10 लाखांचा दंड
महाराष्ट्रात आता हेल्थ सप्लिमेंट्स आणि प्रोटीन उत्पादनांचा प्रचार करणाऱ्या फिटनेस इन्फ्लुएंसर्सच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कोणतीही योग्य परवानगी किंवा अधिकृत आधार नसताना हेल्थ सप्लिमेंट्सबाबत दिशाभूल करणारे आरोग्यविषयक दावे केल्यास तब्बल 10 लाख रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो, असा इशारा महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) दिला आहे.
FDA आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली हेल्थ सप्लिमेंट्सच्या विक्री आणि जाहिरातींवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. यासाठी जिम, फिटनेस सेंटर, फार्मसी आणि सप्लिमेंट्स विक्री करणाऱ्या प्रतिष्ठानांची तपासणी केली जात आहे. संबंधित व्यवसायांनी आवश्यक अन्नसुरक्षा परवाने घेणेही बंधनकारक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, FDA च्या अलीकडील कारवाईत सहा विभागांमध्ये 17 न�
Pune City, Pune | Nov 21, 2026