🚨 रेल्वे पोलिसांच्या वर्तनावर गंभीर आरोप!
दरभंगा-अमृतसर एक्सप्रेस (15211) मधील रेल्वे पोलिस कर्मचाऱ्यांनी महिला प्रवाशांसोबत मारहाण आणि गैरवर्तन केल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, या आरोपांमुळे रेल्वे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या यंत्रणेतील कर्मचाऱ्यांवरच असे आरोप होत असतील, तर महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर येतो.
या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
महिलांची सुरक्षा आणि सन्मान यांच्याशी कोणतीही तडजोड होता कामा नये!
#RailwayPolice #WomensSafety #IndianRailways #DarbhangaAmritsarExpress #TimesOfMaharashtra
Pune City, Pune | Nov 21, 2026