काटोल: शाळांकडून पालकांची लूट! तिरुपती इंटरनॅशनल स्कूलच्या कारभारावर शेतकरी संघटनेचा प्रहार
Katol, Nagpur | Apr 5, 2026 गेल्या काही महिन्यांपासून काटोल आणि नरखेड तालुक्यातील शाळांमध्ये NCERT च्या पुस्तकांचा वापर करण्याबाबत प्रशासनाने स्पष्ट निर्देश दिले आहेत. मात्र, काही खाजगी शाळा नियमांना बगल देऊन पालकांची आर्थिक लूट करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.