कामठी: कामठीत कत्तलखान्याकडे जाणारे १६ गोवंश वाचवले; रुद्र दूध डेअरीच्या मालकावर गुन्हा दाखल
Kamptee, Nagpur | May 16, 2026 कत्तल करण्याच्या उद्देशाने निर्दयीपणे डांबून ठेवलेल्या १६ गोवंशीय बैलांची नवीन कामठी पोलिसांनी सुटका केली आहे. नेरी रोडवरील गादा गावाजवळ असलेल्या 'रुद्र जनावरे खरेदी विक्री व्यापारी व रुद्र दूध डेअरी फार्म'वर पोलिसांनी ही कारवाई केली.मिळालेल्या माहितीनुसार,नवीन कामठी पोलिसांना गादा गावाजवळील एका डेअरी फार्ममध्ये जनावरांना क्रूर वागणूक दिली जात असल्याची माहिती मिळाली.