उरण: गोदांमासाठी निसर्गाचा घात; खारफुटीची कत्तल
Uran, Raigad | Apr 26, 2026 रायगड जिल्ह्याचे प्रवेशद्वार आणि औद्योगिक केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उरण तालुक्यात सध्या विकासाच्या नावाखाली निसर्गसंहार सुरू आहे. एकेकाळी घनदाट वनराई आणि डोंगरांनी वेढलेला हा तालुका आता सिमेंटच्या गोदामांचे आणि धुळीचे साम्राज्य बनला आहे. उरणमध्ये पसरलेल्या कंटेनर गोदामांच्या जाळ्याने पर्यावरणाचा समतोल पूर्णपणे ढासळला असून, याला वनविभाग आणि स्थानिक प्रशासनाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष कारणीभूत ठरत आहे.