Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Coronavirus
कांग्रेस
मौत
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
मध्यप्रदेश
Bollywood
Breakingnews
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
Uttarpradesh
Haryana
Uttarakhand
Crimenews
Karnataka
Education
Rss
Firozabad

उरण: अरबी समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या बोटी रिकाम्याच परतल्या

Uran, Raigad | Feb 2, 2026
अरबी समुद्रात उत्तरेकडील वाढत्या थंड वादळी वाऱ्यांची लहर सुरू झाल्याने उरणसह पश्चिम किनारपट्टीवरील मच्छीमारांवर गंभीर संकट ओढावले आहे. गारठलेल्या खोल समुद्रात मासळी मिळेनाशी झाल्याने मत्स्यदुष्काळाची स्थिती निर्माण झाली असून सुमारे ३०० हून अधिक मच्छीमार बोटी मासळीविनाच माघारी परतल्या आहेत. या परिस्थितीमुळे मच्छीमारांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले असून हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सध्या उरणजवळील करंजा बंदरात सुमारे ३०० मासेमारी बोटी नांगरून उभ्या आहेत. खोल समुद्रात मासेमारीसाठी जाण्यासाठी एका बोटीला सहा दिवसांच्या ट्रिपसाठी प्रचंड खर्च करावा लागतो.
उरण: अरबी समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या बोटी रिकाम्याच परतल्या - Uran News