काटोल: काटोलमध्ये सट्टापट्टी जुगारावर पोलिसांची धाड; आरोपी अटक
Katol, Nagpur | May 19, 2026 गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे काटोल पोलिसांनी ढवळापूर येथे पंचांसमक्ष धाड टाकली. या कारवाईत ग्राहकांकडून पैसे स्वीकारून सट्टापट्टीचे आकडे लिहून जुगाराचा खेळ चालवताना आरोपी रोशन माणिकराव कांबळे याला रंगेहाथ पकडण्यात आले.आरोपीच्या ताब्यातून सट्टापट्टीचे आकडे लिहिलेले कागद, निळ्या शाईचा बॉलपेन (किंमत ५ रुपये) आणि नगद ३५० रुपये, असा एकूण ३५५ रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.