कामठी: गादा येथील शेतात आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह; पोलिसांकडून ओळख पटवण्याचे आवाहन
Kamptee, Nagpur | Apr 10, 2026 नवीन कामठी पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका ५० ते ५५ वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ माजली आहे. ही घटना ९ एप्रिल रोजी सकाळी ९:३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली.मिळालेल्या माहितीनुसार, नवीन कामठी पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या 'अशोक लेलँड' कंपनीजवळून नहरकडे जाणाऱ्या पांधन रस्त्यालगत, गादा गाव येथील शेखर भारद्वाज यांच्या शेतात एक अनोळखी पुरुशाचा नग्नावस्थेत मृतदेह आढळला.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.