बदनापूर: केळी गव्हाण येथे आमदार नारायण कुचे यांनी गावाला भेट देत साधला गावकऱ्यांशी संवाद
आज दिनांक 7 मे 2020 वार गुरुवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास बदनापूर आंबड विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार नारायण कुचे यांनी बदनापूर तालुक्यातील केळीगव्हाण येथे गावाला भेट देत गावातील ज्येष्ठ नागरिक शेतकरी मंडळी तसेच तरुण वर्ग यांच्याशी विविध मुद्द्यांवर संवाद साधत त्यांच्या अडीअडचणी जाणून घेत चर्चा केली आहे. प्रसंगी गावातील तरुण मंडळी शेतकरी हे मोठ्या संख्येने उपस्थित झाल्याचे पाहायला मिळाले आहे.