उमरेड: चोरट्याच्या निशान्यावर थेट आमदारांचे घर, उमरेड विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय मेश्राम यांच्या घरी चोरी करणारा गजाआड
Umred, Nagpur | Jul 7, 2026 उमरेडचे आमदार संजय मेश्राम यांच्या विहिरगाव येथील हेरिटेज अपार्टमेंटच्या फ्लॅटमध्ये दिवसाढवळ्या चोरीची घटना घडली आहे.आरोपीने ७५ हजार रुपये रोख आणि चेकबुक चोरले. चोरलेल्या चेकचा वापर करून आणि बनावट आधार कार्ड दाखवून बँकेतून अडीच लाख रुपये लंपास केले.