उरण: पावसाळ्यामुळे जेएनपीए-मुंबई जलवाहतुकीच्या मार्गात बदल
Uran, Raigad | Jun 5, 2026 पावसाळ्यात खवळणारा समुद्र, वादळी वारे आणि उसळणाऱ्या महाकाय लाटांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणाच्या जलवाहतूक विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. जेएनपीए बंदर ते मुंबई (गेट वे ऑफ इंडिया) दरम्यान चालणारी नियमित प्रवासी बोट सेवा पावसाळ्याच्या कालावधीपुरती भाऊचा धक्का (फेरी व्हार्फ) येथून चालवली जाणार आहे, अशी माहिती जेएनपीए जलवाहतूक विभागाचे कॅप्टन बाळासाहेब पवार यांनी दिली. ही तात्पुरती व्यवस्था 1 जून ते 30 सप्टेंबर पावसाळा संपेपर्यंत लागू राहील आणि त्यानंतर सेवा पुन्हा पूर्ववत केली जाईल.