शहादा: लोकसभा निवडणूक आणि सण उत्सवांच्यानिमित्त डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकापासून पोलिसांचा रूट मार्च
नंदुरबार लोकसभा निवडणूक व सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शहादा शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून नंदुरबार जिल्हा पोलीस दलातर्फे विविध मार्गावरून पोलिसांचा रूटमार्च काढण्यात आला. या रूट मार्चमध्ये पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस, अप्पर पोलीस अधीक्षक निलेश तांबे , प्रांताधिकारी सुभाष दळवी, उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव वाघमारे यांच्यासह 191 पोलीस कर्मचारी व सीमा रक्षक दलाची तुकडी सहभागी झाले होती.