शहादा: सारंगखेडा येथील तापी नदी पुलावरून उडी घेत 43 वर्षीय व्यक्तीची आत्महत्या
शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथील तापी नदी पुलावरून नदीत उडी मारून शिंदखेडा तालुक्यातील रामी येथील ग्रामपंचायतीचे विद्यमान उपसरपंच जवानसिंग काशिनाथ गिरासे वय 43 वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ते शहादा येथे काहीतरी कामानिमित्त गेले होते ते त्यांच्या गावाकडे रामी येथे परतत असताना सारंगखेडा पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच सारंगखेडा पोलीस घटनास्थळी दाखल झाले .