शहादा: कर्मचाऱ्यांना उद्धटपणाची वागणूक देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा, अंगणवाडी सेविकांचा जिल्हा परिषदेवर थाळीनाद मोर्चा
नंदुरबार जिल्हा परिषदेवर गुरुवारी जिल्ह्यातील हजारोंच्या संख्येने अंगणवाडी सेविकांनी थाळीनाद मोर्चा काढला. यावेळी विविध मागण्या करण्यात आल्या आहेत. जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांच्याकडून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना उद्धटपणाची वागणूक देण्यात येते व अपमान करण्यात येते असल्याची नाराजी कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली. म्हणून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.