महाड: महाडमध्ये आजपासून एक दिवसाआड होणार पाणीपुरवठा
Mahad, Raigad | Apr 16, 2026 महाड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कोथुर्डे धरणातील जिवंत पाणीसाठा कमी झाल्याने धरणातील मृतसाठा पंपाद्वारे उचलून सद्यस्थितीमध्ये पाणीपुरवठा करावा लागत असल्याने या धरणातून महाड शहराच्या जवाहर नगर, रोहिदास नगर ते भीम नगर सुलतान गल्ली पर्यंतच्या दक्षिण दिशेकडील भागाला बुधवारपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जाईल अशी माहिती मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांनी दिली आहे.