काटोल: संशयास्पद रित्या वावरणाऱ्या तरुणावर काटोल पोलिसांची कारवाई
Katol, Nagpur | May 7, 2026 अस्तित्व लपवून गुन्हासज्ज अवस्थेत फिरणाऱ्या एका उत्तर भारतीय तरुणाला काटोल पोलिसांनी अटक केली आहे. **मोनू अशोक कुमार** वय ३४ वर्ष , राहणार गाझियाबाद, उत्तर प्रदेश असे आरोपीचे नाव आहे. ५ मे रोजी रात्री काटोल बस स्थानक परिसरात गस्त घालत असताना हा तरुण पोलिसांना संशयास्पद रित्या फिरताना आढळला. चौकशी दरम्यान त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने, तो दखलपात्र गुन्हा करण्याच्या उद्देशाने वावरत असल्याचे निष्पन्न झाले.