उमरेड: उमरेडमधील 'आम' नदीच्या प्रदूषणाबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; तातडीने कार्यवाहीचे आश्वासन
Umred, Nagpur | May 18, 2026 उमरेड परिसरातील आम नदी पात्रात वाढत चाललेले प्रदूषण आणि औद्योगिक रासायनिक कचऱ्याची बेकायदेशीर विल्हेवाट या गंभीर प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी आज जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर करण्यात आले.गेल्या काही काळापासून रासायनिक सांडपाण्यामुळे आम नदीचे पाणी कमालीचे दूषित झाले आहे. याचा थेट परिणाम परिसरातील नागरिक, शेतकरी आणि जनावरांच्या आरोग्यावर होत असून पर्यावरणाचा समतोलही धोक्यात आला आहे.