रामटेक: चोरबावली शिवारात भीषण अपघात ; ट्रकच्या धडकेत स्कार्पिओ पलटली; तिघे गंभीर जखमी
Ramtek, Nagpur | Mar 15, 2026 नागपूर - जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील पोलीस स्टेशन देवलापार अंतर्गत येणाऱ्या चोर बावली शिवारात रविवार दिनांक 15 मार्चला दुपारी सुमारे साडेतीन वाजता चे दरम्यान भीषण अपघातात भरधाव ट्रक ने मागून दिलेल्या जोरदार धडकेत स्कार्पिओ वाहन पलटले. यात तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत स्कार्पिओ घेऊन चालक उमाशंकर पारधी राहणार चाचेर हा आपल्या नातेवाईकांसह मध्य प्रदेश तील कुरई येथे औषधोपचारासाठी जात होता.