कामठी: पावनगाव ब्रिज येथे अज्ञात चार चाकी वाहनाच्या धडकेत न्यू येरखेडा येथील महिलेचा मृत्यू
रेशमा पाचे वय 47 वर्ष राहणार न्यू येरखेडा या त्यांच्या ऍक्टिवाने त्यांचे मित्र सुरज लक्षणे यांच्यासोबत डबल सीट जात असताना पावनगाव ब्रिज येथे अज्ञात पांढऱ्या चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. दरम्यान गंभीर जखमी रेश्मा व तिचा मित्र सुरज यांना उपजिल्हा रुग्णालय कामठी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले असता रेश्मा चा उपचारादरम्यान 7 मे ला मृत्यू झाला. सुरज यांचा उपचार न्यूरॉन हॉस्पिटल येथे सुरू आहे.